Ganpati Aarti in Marathi: Sukhakarta Dukhaharta and more, to print
The aartis sung at Ganesh Chaturthi in Mumbai and across Maharashtra, in the order they are usually sung, in Marathi (the Hindi aarti and the Sanskrit verses as they are sung). Families and mandals vary the order a little, and many shorten it on weekdays. Press Print, or download the PDF, for a clean copy without the menus or ads.
॥ श्री गणेशाय नमः ॥
गणपतीच्या आरत्या
- सुखकर्ता दुःखहर्ता (Ganpati)
- शेंदुर लाल चढायो (Ganpati, Hindi)
- लवथवती विक्राळा (Shankar)
- दुर्गे दुर्घट भारी (Devi)
- त्रिगुणात्मक त्रैमूर्ती (Datta)
- येई हो विठ्ठले (Vitthal)
- आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा (Sant Dnyaneshwar, Sant Tukaram)
- युगे अठ्ठावीस विटेवरी उभा (Vitthal)
- घालीन लोटांगण (prayer)
- मंत्रपुष्पांजली (Sanskrit)
- जयघोष (closing chant)
१. सुखकर्ता दुःखहर्ता श्री गणपतीची आरती · समर्थ रामदास
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥
जय देव जय देव…
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥
जय देव जय देव…
२. शेंदुर लाल चढायो श्री गणपतीची आरती (हिंदी) · गोसावीनंदन
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।
हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पदको ॥ १ ॥
जय देव जय देव जय जय श्रीगणराज ।
विद्यासुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ धृ ॥
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥ २ ॥
जय देव जय देव…
भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥ ३ ॥
जय देव जय देव…
३. लवथवती विक्राळा श्री शंकराची आरती · समर्थ रामदास
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥
जय देव जय देव…
देवी दैत्य सागरमंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हळाहळ जे उठिले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥
जय देव जय देव…
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ ४ ॥
जय देव जय देव…
४. दुर्गे दुर्घट भारी श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणांते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।
सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥
त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
जय देवी जय देवी…
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशापासुनि सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
जय देवी जय देवी…
५. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती श्री दत्ताची आरती · संत एकनाथ
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥
जय देव जय देव…
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ३ ॥
जय देव जय देव…
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
जय देव जय देव…
६. येई हो विठ्ठले श्री विठ्ठलाची आरती · विष्णुदास नामा
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे ॥ धृ ॥
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥
येई हो विठ्ठले…
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥ २ ॥
येई हो विठ्ठले…
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दीपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी ॥ ३ ॥
येई हो विठ्ठले…
७. आरती ज्ञानराजा संत ज्ञानेश्वरांची आरती · रामा जनार्दन
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥ धृ ॥
लोपले ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविले ज्ञानी ॥ १ ॥
आरती ज्ञानराजा…
कनकाचे ताट करी । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ २ ॥
आरती ज्ञानराजा…
प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केले ।
रामा जनार्दनी । पायी टकचि ठेले ॥ ३ ॥
आरती ज्ञानराजा…
आरती तुकारामा संत तुकारामांची आरती
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवी आम्हां ॥ धृ ॥
राघवे सागरात । पाषाण तारियेले ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ १ ॥
आरती तुकारामा…
तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ।
म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ २ ॥
आरती तुकारामा…
८. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा श्री विठ्ठलाची आरती · संत नामदेव
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ २ ॥
जय देव जय देव…
धन्य वेणुनाद अणुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राही रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥ ३ ॥
जय देव जय देव…
ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥
जय देव जय देव…
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ ५ ॥
जय देव जय देव…
९. घालीन लोटांगण प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंदे पूजीन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ॥ १ ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥
अच्युतं केशवं रामनारायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचन्द्रं भजे ॥ ४ ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ ५ ॥
१०. मंत्रपुष्पांजली फुले वाहताना
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः ॥
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् । पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ॥
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ श्री गणेशाय नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ॥
११. जयघोष
गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ॥
पुढच्या वर्षी लवकर या ॥ (at the immersion, visarjan)