धवलांतर – पाऊल
घंटांचे नाद अनाहत
आभाळ शंखध्वनींचे
क्षितिजावर रविबिंबातून
पाऊल तुझे सोन्याचे

ध्वज भगवा आणि पताका
दिंड्यांतून वैष्णव येती
शिवध्यानातिल ॐ कार
ही खोळ उसवूनी जाती

व्याकूळ कशाला व्हावे
विषयांच्या आक्रमणांनी
ही तुझीच सारी माया
विरणार तुझ्या किरणांनी

तरी साहवते ना अंतर
थकवितो ईंद्रिये म्हणूनी
पदणार देह पडावा
ना विषयी, तुझ्याच चरणी

समीर
                           Poem List                   Maharashtraweb Home          Submit your poem